घरमहाराष्ट्र२६८ महसुली मंडलामध्ये सरकारचा दुष्काळ घोषित

२६८ महसुली मंडलामध्ये सरकारचा दुष्काळ घोषित

Subscribe

पुणे जिल्ह्यातील 19 मंडलांचा नव्याने समावेश करण्यात आला असून येथे दुष्काळी परिस्थितीसाठीच्या शासन सोयी-सवलती होणार लागू होणार आहे

राज्य सरकारने यापूर्वीच राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यांतील महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत पाऊसाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. अशा राज्यातील २६८ महसुली मंडलांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील महसुली मंडलामध्ये १९ मंडलांचा समावेश आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांबरोबरच या १९ मंडलांमधील गावांनाही शासनाच्या सोयी-सवलती लागू होणार आहेत.

जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत जेथे पाऊस सरासरीपेक्षा ७५ टक्क्यांनी कमी झाला. तसेच एकूण पावसाची नोंद ७५० मिलीपेक्षाही कमी झाली, अशा 238 महसूल मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करून शासनाकडून मदत केली जाणार आहे. दुष्काळी भागांतील नागरिकांना सोयी-सुविधा तसेच त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकार्‍यांकडे सोपविली आहे.

- Advertisement -

शासनाकडून या गावांना जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांचा शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, अशा सवलती मिळणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील महसूल मंडल
हवेली तालुका :- थेऊर, उरुळीकांचन, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली.
मुळशी तालुका :- थेरगाव.
भोर तालुका :- वेळू
जुन्नर तालुका :- जुन्नर, नारायणगाव, वडगाव, निमुलगाव, बेल्हा, ओदूर,
खेड तालुका :- चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर
या महसूल मंडलांचा समावेश दुष्काळी गावांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -