घरमहाराष्ट्रमुंबई विभागातून २७५७ शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शाळेत

मुंबई विभागातून २७५७ शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शाळेत

Subscribe

शाळांमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी आणि शालेय शिक्षण पुन्हा रुळावर आणण्यासाठी शिक्षण विभागाने ५ ते २० जुलै २०२२ दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ हाती घेतले होते. त्यानुसार मुंबई विभागातून तब्बल २७५७ विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे.

शाळांमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी आणि शालेय शिक्षण पुन्हा रुळावर आणण्यासाठी शिक्षण विभागाने ५ ते २० जुलै २०२२ दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ हाती घेतले होते. त्यानुसार मुंबई विभागातून तब्बल २७५७ विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. मुंबई विभागात पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक १००६ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहे. (2757 out of school students from Mumbai division back to school)

कोरोना महामारीमुळे शिक्षणातील असमानता वाढली. पालकांची आर्थिक परिस्थिती कोलमडल्याने अनेक विद्यार्थी हे शिक्षणपासून दूर गेले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी तसेच शाळातून गळती झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ मोहीम हाती घेण्यात आली होती. मुंबई विभागातून शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि मुंबई महापालिकेचे शिक्षक, बालरक्षक यांनी ५ ते २० जुलैदरम्यान घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, सर्व खेडी, गाव, वाडी, शेतमळ्यात, जंगलात वास्तव्य करणार्‍या पालकांची शाळाबाह्य बालके, बालमजूर तसेच स्थलांतरित कुटुंबांमधून येणारी बालके, मागास, वंचित गटातील व अल्पसंख्याक गटातील वस्तीतील बालके यांचा शोध घेऊन तब्बल २७५७ विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात यश मिळवले.

- Advertisement -

या मोहिमेंतर्गत पुन्हा शाळेत आणण्यात आलेल्या मुलांमध्ये ३ ते १८ वयोगटातील कधीच शाळेत न गेलेली मुले आणि अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांचा समावेश आहे. ३ ते १८ वयोगटातील कधीच शाळेत न गेलेली बालकांची संख्या ८०८ इतकी असून यामध्ये मुलांची संख्या ४२५ तर मुलींची संख्या ३८३ इतकी आहे. तसेच अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या १९४९ इतकी असून यामध्ये मुलांची संख्या ९७३ तर मुलींची संख्या ९६६ इतकी आहे. यातून कोरोनामुळे स्थलांतर झाल्याने किंवा शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

मुंबई विभागातील पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक १००६ शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. त्याचप्रमाणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दक्षिण, उत्तर व पश्चिम या तीन विभागातून ६०७, तर मुंबई महापालिकेकडून ३१६ विद्यार्थ्यांना तसेच ठाणे जिल्ह्यातून ७५० आणि रायगड जिल्ह्यातून ७८ विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात यश आले आहे. पुन्हा शाळेमध्ये आणण्यात आलेल्या मुलांची संख्या १३९८, तर मुलींची संख्या १३४९ इतकी आहे.

- Advertisement -

विशेष गरजाधिष्ठित ४७ बालकांचा समावेश

कोरोनानंतर निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकजण बेरोजगार झाल्याने शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा शाळेत आणण्यात आले. यामध्ये विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांची संख्या ४७ इतकी आहे. पालघरमधून २५, ठाणे ११, मुंबई १० आणि रायगड १ इतक्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात आले.

तालुका = विद्यार्थी संख्या

दक्षिण =२३७
उत्तर =१०१
पश्चिम =२६९
रायगड =७८
पालघर =१००६
मुंबई मनपा =३१६
ठाणे =७५०
एकूण =२७५७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -