Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यात २,९१० नवे रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू

राज्यात २,९१० नवे रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू

राज्यात ५२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०, ३८८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात २,९१० नवीन रुग्णांची नोंद झाली झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,८७,६७८ झाली आहे. राज्यात ५१,९६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ५२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०, ३८८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ८,नंदुरबार ३, सोलापूर ८, उस्मानाबाद ३, भंडारा ३, गोंदिया ३ आणि अन्य राज्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५२ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू गोंदिया ३, ठाणे ३, यवतमाळ २, भंडारा २, पुणे २, नागपूर १ आणि जळगाव १ असे आहेत.

- Advertisement -

आज ३,०३९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,८४,१२७ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३७,४३,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८७,६७८ (१४.४६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,७०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -