Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुण्यात पुन्हा ३.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

पुण्यात पुन्हा ३.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

पुण्यातील पुरंदरमध्येही आला होता भूकंप

Related Story

- Advertisement -

पुण्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) सकाळच्या वेळेस पुण्यात ३.३ तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने याबाबत माहिती दिली आहे. मागील महिन्यातही पुण्याच्या पुरंदरमध्ये भूकंपाचे हादरे बसले होते. पुरंदरमध्ये आलेल्या भूकंपामुळे पुण्यात जवळपास २ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. परंतु आज पुण्यात आलेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित आणि आर्थिकहानी झाली नाही आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र असलेल्या पुण्यात सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळी ५.२९ वाजता जमिनीत ६ किलोमीटरंतर्गत हा भूकंपाचा झटका जाणवला होता.

- Advertisement -

पुण्यातील पुरंदरमध्येही आला होता भूकंप

पुण्यातील पुरंदरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले होते. या भूकंपाची माहिती नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने माहिती दिली आहे. या भुकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. परंतु भूकंपाच्या धक्क्याने पत्रे, मोकळी भांडी, वस्तुला कंपने जाणवत होती.

जम्मूतही जाणवले भूकंपाचे धक्के

- Advertisement -

जम्मू काश्मीरमधील लडाखमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७.३९ वाजता ३.७ रिश्टर स्केलचे भूकंपाचा धक्के बसले आहेत. हा भूकंप लडाख क्षेत्रात आला असून २०० किलोमीटर जमिनीच्या भूगर्भात आला आहे.

- Advertisement -