Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Heroin Seized Mumbai : मुंबई विमानतळावरून तब्बल ३ किलोचे ड्रग्ज जप्त, NCB...

Heroin Seized Mumbai : मुंबई विमानतळावरून तब्बल ३ किलोचे ड्रग्ज जप्त, NCB ची मोठी कारवाई

Subscribe

एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटकडून मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करांविरोधात NCBने कारवाई केली आहे. यामध्ये ३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. तसेच एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला देखील एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.

मुंबई विमानतळावर ड्रग्ज सापडल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने कारवाई केली. या कारवाईत बॅगमध्ये ड्रग्जचे चार पाकिटं आढळून आली आहेत. जवळपास ३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

मागील १३ मार्चला देखील दहीसर पोलिसांनी देखील ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई केली होती. यावेळी ६ किलो ५६० ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तसेच या ड्रग्जची किंमत १ कोटी ९५ लाख रूपये इतकी होती. त्यावेळी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तिला ताब्यात घेण्यात आलं होतं.


- Advertisement -

हेही वाचा : मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचं निधन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -