Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात 3 ठार

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात 3 ठार

Subscribe

सर्व मृत मुंबईचे रहिवाशी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गावाच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री बलेनो कार आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील 3 प्रवाशी ठार झाले. तर कार चालक आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व मृत हे मुंबईमधील असून ते कणकवली येथे लग्न सोहळ्याला गेले होते. लग्नसोहळा आटोपून बलेनो कारने मुंबईकडे येत असताना मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास कार (एमएच ०५- डीएस ६८६१) आणि बसची (एमएच- ४८ बीएम ६२९९) समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात संदीप सीताराम पाटील (४०,कल्याण) हे जागीच ठार झाले.

- Advertisement -

तर साधना निलेश राऊत (४५, जोगेश्वरी मुंबई), अनिल दत्ताराम राणे (४५, जोगेश्वरी) हे उपचारादरम्यान मृत्यू पावले. कार चालक दीपक सीताराम पाटील आणि सुगंधा सीताराम पाटील (७०) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू पावलेले संदीप पाटील हे कार चालक दीपक पाटील यांचे सख्खे भाऊ होते. अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -