घरCORONA UPDATECoronavirus : नगरमध्ये आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या २० वर

Coronavirus : नगरमध्ये आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या २० वर

Subscribe

आत्तापर्यत दोन रुग्ण कोरोनामुक्त करणाऱ्या आरोग्य विभागाकडे कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच असल्याचे स्पष्ट झाले.

अनंत पांगारकर

कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला आरोग्य विभागाने शनिवारी घरी साेडले. हा रुग्ण घरी पोहोचत नाही. तोच रात्री उशिराने नगरमध्ये पुन्हा तीन कोरोना बाधीत आढळले. आत्तापर्यत दोन रुग्ण कोरोनामुक्त करणाऱ्या आरोग्य विभागाकडे कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच असल्याचे स्पष्ट झाले. नगरमध्ये आता कोरोना बाधितांची संख्या २० वर गेली आहे. शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात नगरमधील दोन तर लोणीच्या एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर बुथ रुग्णालयाच्या आयसोलेशनमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ कोरोना संशयितांचे अहवाल जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला शनिवारी रात्री प्राप्त झाले. यात तिघेजण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा आलेख वाढला आहे. पुण्याच्या एनआयव्हीकडे कोल्हार, श्रीगोंदा, शेवगावमधील संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारपर्यत ही संख्या ४७९ वर गेली होती. त्यापैकी ४५६ अहवाल निगेटिव्ह आले. तर २० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही काही अहवाल प्रलंबित असून जिल्हा रुग्णालयात ११० जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर हायरिक्समधील ३८० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. २४० जणांनी होम क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

कोरोना बाधितांचा आणि संशयितांचा वाढत चाललेला आकडा डोकेदुखी बनल्याने प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. तर संचारबंदीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. स्वत: जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरुन कारवाया करु लागल्याने प्रशासनानेदेखील कारवाया करण्यास सुरुवात केल्याने रस्त्यावर रिकामे फिरणाऱ्यांना बऱ्यापैकी चाप बसला आहे.

- Advertisement -

१८ जणांवर उपचार सुरु

नगरमध्ये आत्तापर्यत दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यात नगरमधील एक आणि नेवाश्यातील एकाचा समावेश आहे. हे दोघेही पुढील काही दिवस आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली राहणार आहेत. शनिवारी नेवाश्यातील रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून हा रुग्ण १७ मार्चला सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. परदेशातून परत आल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्ह्यातील अन्य करोनाबाधित १५ जणांची प्रकृती ठणठणीत असून नव्याने तिघांना दाखल केल्याने आता रुग्णालयात १८ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आठवडा ठरला रुग्णसंख्या वाढविणारा

२९ मार्च ते ४ एप्रिल हा आठवडा नगरसाठी धोकादायक ठरला आहे. २८ मार्चपर्यत जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित होते. नंतरच्या सहा दिवसात ही संख्या २० वर गेली. या सहा दिवसात १७ रुग्ण वाढले आहे. जवळपास नऊपट वाढ यात झाली. यात चार परदेशी नागरिक, दोन परप्रांतीय तर उर्वरित स्थानिक असून संगमनेरमधील ४, जामखेडमधील ४, नगरमधील ४, नेवासे १, लोणीच्या एकाचा समावेश आहे. यातील दोघे बरे झाले तर उर्वरित सर्वांवर उपचार सुरु आहेत. परदेशी नागरिकांमुळे यातील अनेक जण बाधीत झाल्याचे समोर आले. शनिवारी आढळेल्यात एक ७६ वर्षाचा, दुसरा ४६ तर तिसरा अवघा ३५ वर्षीय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -