सातारकरांच्या चिंतेत वाढ! फलटणमध्ये ३ रुग्ण Omicron पॉझिटिव्ह

omicron strengthen the health system union health secretary s letter to the states
Omicron : आयसोलेशन बेड्स, अॅम्ब्युलन्सची संख्या वाढवा, केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र, केल्या या सूचना

सातारकरांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. शनिवारी सातारा जिह्यातील फलटन तालुक्यात ओमिक्रॉनचे तीन रुग्ण आढळले आहेत. यातील एका रुग्णाचा अहवाल येणे बाकी आहे.  काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात ३७६ लोक परदेशातून आले होते. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी तपासणी करण्यात येत होती. काही संशयित रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एकाच घरातील चार जणांचा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सी अहवाल पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू अहवाल संस्थेकडे पाठवण्यात आले होते. शनिवारी या रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला त्यातील तीन जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाचा अहवाल येणे अजून बाकी आहे.

साताऱ्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने प्रशसनाची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा सध्या शोध सुरू असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ओमिक्रॉन बाधित रुग्ण सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत असून आरोग्य प्रशासम या रुग्णांकडे लक्ष ठेवून आहे.

राज्यात शुक्रवारी ८ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली.  राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची ४० वर पोहचली होती. मात्र आता फलटणमध्ये सापडलेल्या ३ बाधित रुग्णांमुळे आता राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ही४३ वर गेली आहे. शुक्रवारी राज्यातील २५ ओमिक्रॉन रुग्णांनी ओमिक्रॉनवर यशस्वी मात केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सातारा जिल्ह्याला सर्वाधिक झळ बसली होती. जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. तर साडेसहा हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोनाच्या ओमिक्रॉन रुग्णाचा शिरकाव झाल्याने जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.


हेही वाचा – Omicron Variant: राज्यात आज ओमिक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची भर: एकूण आकडा ४०वर