घरमहाराष्ट्रनोकरीचे आमिष दाखवून वेशव्यवसायात अडकवणारे त्रिकुट अटकेत

नोकरीचे आमिष दाखवून वेशव्यवसायात अडकवणारे त्रिकुट अटकेत

Subscribe

गरिब आणि गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना आखाती देशात वेश्यव्यवसाय करण्यासाठी पाठवाणाऱ्या त्रिकुटाला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

नोकरीचे आमिष दाखवून आखाती देशात वेशव्यवसायासाठी घेऊन जाणाऱ्या त्रिकुटाला पकडण्यात मुंबई खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. या तिघांच्या जाळ्यात जवळपास ५० ते ६० महिला अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र बेहरीमध्ये अडकलेल्या एका राजस्थानमधील महिलेच्या धाडसामुळे मोठ रॅकेटचा पर्दाफा करण्यात मुंबई पोलिसांना यश आले असून या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी आरोपी मोहम्मद कमाल अन्वर शेख (५६), टिंकू दिनेश राज (३६) आणि फरीद उल हक शहा उर्फ टिपू यांना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत असून या तिघांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हे तिघेही या रॅकेटचे एजंट असून मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

५० हजार पगार द्यायचे

पोट भरण्यासाठी गरिब आणि गरजू महिलांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना आखाती देशात पाठवायचे. दुबई, बेहरीनसारख्या आखाती देशात अधिक पगार मिळणार असून तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. असे हे तिघ जण महिलांना सांगायचे. त्यानुसार गरजू महिला जाण्यासाठी तयारी दाखवायच्या. त्या आखाती देशात गेल्यानंतर त्यांची मुख्य आरोपीचे हॉटेल असलेल्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय केली जायची. त्यांना महिनाभर काम केल्यानंतर त्यांना ५० हजार पगार दिला जायचा आणि त्यानंतर त्यांना वेश्यव्यवसाय करण्यासाठी अन्य ठिकाणी पाठवले जायचे. तर इतर महिलांना आखाती देशात अडकलेल्या महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जायचे. तर ज्या महिला वेश्याव्यवसाय करण्यास नकार द्यायच्या त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात येत होते. नोकरीच्या आमिषास बळी पडलेल्या महिला बांगलादेशी, राज्यस्थानी आणि नेपाळी असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

अशी झाली सुटका

या जाळ्यात अडकलेल्या एका महिलेने वेश्यव्यवसाय करण्यासाठी विरोध केला. त्या महिलेने विरोध केल्यामुळे तिला हॉटेलमध्ये डांबून ठेवले. या महिलेने संधी मिळताच आपल्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार तिच्या कुटुंबातील सदस्यांनी एजंटशी संपर्क साधला. त्यावर एजंटने तिला सोडण्यासाठी २ लाखाची रक्कम मागितली आहे. दोन लाख दिल्यानंतर तिची सुटका करण्यात आली. या महिलेची सुटका झाल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार मुंबई पोलिसांना सांगितला. पोलिसांनी देखील घडलेल्या घटनेची दखल घेत वेश्याव्यसायाचे रॅकेटचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा कसून शोध सुरु आहे.

वाचा – ‘छमछम’ला मिळणार हिरवा कंदील?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -