घरCORONA UPDATEराज्यात २४ तासांत ३ हजार १४२ नव्या रुग्णांची नोंद, तर ७ रुग्णांचा...

राज्यात २४ तासांत ३ हजार १४२ नव्या रुग्णांची नोंद, तर ७ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार १४२ इतक्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात एकूण ३ हजार ९७४ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर हा १.८५ टक्के इतका आहे.

राज्यामध्ये ७८,२५,११४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९० टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एकूण १९ हजार ९८१ सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे ५६०० इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यात ३ हजार ३८४ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

बी ए.५ व्हेरीयंटचे ६ आणि बी ए. ४ चे तीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या शिवाय बीए. २.७५ या व्हेरियंटचे राज्यात एकूण १० रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत.

देशातील स्थिती काय?

देशातील कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १६ हजार १५९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायमस्वरूपी विकास आराखडा तयार करणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -