घरमहाराष्ट्रजीवघेणी हवा, ३० पैकी २१ प्रदूषित शहरे भारतात!

जीवघेणी हवा, ३० पैकी २१ प्रदूषित शहरे भारतात!

Subscribe

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी तब्बल २१ शहरे भारतात आहेत, तर दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे धूलिकणांचे प्रमाण शहराच्या सर्वच भागांत वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी दोन तृतीयांश प्रदूषित शहरे भारतातील असल्याचे समोर आले आहे. जगातील सर्वधिक अशुद्द हवा असलेल्या ३० शहरांपैकी २१ शहरे भारतात आहेत, तर दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे. जागतिक अहवाल २०१९ मधून हे चिंताजनक वास्तव समोर आले आहे. सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांमध्ये महाराष्ट्रातील भिवंडीचाही समावेश आहे. आयक्यूएअर व्हिज्युअल्स या संस्थेने जारी केलेल्या २०१९ जागतिक हवा शुद्धता अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अशुद्ध हवा असलेल्या सर्वोच्च १० शहरांतही ६ शहरे भारतातील आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांमधील २१ भारतीय शहरे

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, प्रदूषित हवेमुळे जगात दरवर्षी ७ दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू होतो. शहरात राहणाऱ्या ८० टक्के लोकसंख्येला घातक हवेचा सामना करावा लागतो. प्रदूषित शहरांत दक्षिण आशियातील शहरांचे प्रमाण अधिक आहे. सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांतील २७ शहरे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील आहेत. गाझियाबाद, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा, बंधवारी, लखनऊ, बुलंदशहर, मुझफ्फरनगर, बाघपत, जिंद, फरिदाबाद, कोराउट, भिवंडी, पाटणा, पलवल, मुझफ्फरपूर, हिसार, कुटैल, जोधपूर, मोरादाबाद ही २१ भारतीय शहरे आहेत.

- Advertisement -

प्रदूषणामुळे वर्षाला तब्बल ७० लाख मृत्यू

कोरोना विषाणूमुळे मृत्यूच्या बातम्या येत असल्या, तरी हवेच्या प्रदूषणामुळे वर्षाला तब्बल ७० लाख मृत्यू होत असल्याचे दुर्लक्षित होत आहे. हा ‘सायलंट किलर’ ठरत आहे. जगभरात अनेक ठिकाणी हवेच्या प्रदूषणाविषयी माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यावर उपाययोजनाच होत नाहीत, ही मोठी समस्या आहे.


हेही वाचा – सीएए हा भारताचा अंतर्गत मुद्दा; त्यावर चर्चा नाही

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -