घरठाणे३०० रिक्षाचालकांनी घेतली सुरक्षित वाहन चालविण्याची शपथ

३०० रिक्षाचालकांनी घेतली सुरक्षित वाहन चालविण्याची शपथ

Subscribe

रस्ते अपघात ग्रस्तांचा जागतिक स्मृतिदिनाचे औचित्य साधून

ठाणे: रोडवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांना जगभरात दरवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या रविवारी त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहिली जाते. तर  रस्ते अपघात ग्रस्तांचा जागतिक स्मृतिदिना निमित्त ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) नवीमुंबई, ऐरोली येथील पाटणी मैदानावर रस्ता सुरक्षा नियमांचे पालन या आयोजित कार्यक्रमात सुमारे ३०० रिक्षाचालकांना शपथ दिली. तसेच यावेळी गंभीर अपघात झालेल्या व्यक्तीचे व रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे मनोगत सर्व उपस्थितांना ऐकविण्यात आले.

ठाणे असो मुंबई येथे वाढत्या नागरीकरणाबरोबर क्रेझ किंवा वाहन ही काळाची गरज झाल्याने खरेदी केली जाते. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनांची संख्या ही वाढताना दिसत आहे. एकीकडे रस्ते छोटे झाले आहेत. त्या तुलनेपेक्षा वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातच वाहन चालवताना वाऱ्याशी स्पर्धा केली जात आहे. त्यातून अपघातांची संख्या ही वाढू लागल्याने यामध्ये मृत्यू मुखी संख्या वाढत आहे. तसेच या अपघातात जखमी होऊन काही जणांना अपंगत्व ही येताना दिसत आहे. दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे वाहतूक नियम पाळण्याबाबत आवाहन केले जात आहे. मात्र ते नियम धाब्यावर बसविण्याकडे वाहनचालक सरसावले असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

- Advertisement -

हे नियम काटेकोर पणे पाळावे, यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकारी-कर्मचारी रस्त्यांवर कार्यरत असतात. त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातच वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या दंडात ही वाढ झाली तरी अजून ही कोणताही फरक पडताना दिसत नाही. मात्र अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या त्या मृतांना अथवा कायमचे अपंगत्व आल्यानंतर त्या कुटुंबावर काय परिणाम होतो हे कोणाला सांगायची गरज नाही. त्यामुळे जास्तीतजास्त वाहतूक नियम पाळून वाहन चालवावे, असे आवाहन रस्ते अपघात ग्रस्तांचा जागतिक स्मृतिदिना निमित्ताने करण्यात आल्याची माहिती ठाणे आरटीओ विभागाने दिली.

रविवारी झालेल्या या कार्यक्रमात गंभीर अपघात झालेल्या व्यक्तीचे व रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे मनोगत सर्व उपस्थितांना ऐकविण्यात आले. याप्रसंगी  ठाणे आरटीओ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक  अमोल पवार, विनोद सुंदराणी,सपना जमदाडे, सम्राट कांबळे यांच्यासह स्थानिक नागरिक व रिक्षाचालक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

- Advertisement -

” या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  नागरिक, चालक  रास्ता सुरक्षितता विषयक, सुरक्षित वाहन चालविण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अपघातात ज्यांचे जवळचे बळी पडले त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त करून इतरांना वाहन चालविताना सुरक्षित वाहन चालविण्याचा सल्ला दिला तसेच यावेळी रास्ता सुरक्षा शपथ देण्यात आली.”

– जयंत पाटील,उपप्रादेशिक, परिवहन अधिकारी ठाणे.


हेही वाचा : जे भांडण सुरू आहे ते लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं आहे – प्रकाश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -