घरताज्या घडामोडीझेंडूच्या शेतीतून तीन तासात ३००० उत्पन्न; पोई गावातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

झेंडूच्या शेतीतून तीन तासात ३००० उत्पन्न; पोई गावातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Subscribe

शेती विश्वात नवनवीन प्रयोग करणारे गुरुनाथ सांबरे यांनी आपल्या शेतात झेंडूच्या फुलांची शेती केली आहे. बदलापूर शहर आणि परिसरात प्रामुख्याने भात आणि भेंडीचे पीक घेतले जाते. मात्र सांबरे हे नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात.

शेती विश्वात नवनवीन प्रयोग करणारे गुरुनाथ सांबरे यांनी आपल्या शेतात झेंडूच्या फुलांची शेती केली आहे. बदलापूर शहर आणि परिसरात प्रामुख्याने भात आणि भेंडीचे पीक घेतले जाते. मात्र सांबरे हे नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांनी सध्या शेतात झेंडूच्या फुलांची लागवड केली. यामधून त्यांना दिवसाला ३००० रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. (3000 income in three hours from marigold farming A successful experiment of a farmer in Poi village)

कल्याण तालुक्यातील पोई गाव बदलापूर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील शेतकरी गुरुनाथ सांबरे शेती करताना नवनवीन प्रयोग करत असतात. सांबरे उच्चशिक्षित असून त्यांनी महाराष्ट्र मित्र मंडळ संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी सुद्धा केलीय. मात्र शेतीत मन रमत असल्यानं त्यांनी शिक्षकी पेशला रामराम ठोकला आणि शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले.

- Advertisement -

पोई गावात प्रामुख्याने भेंडी आणि भाताचे पीक घेतले जाते. मात्र हे हंगामी पीक असल्याने एकाच पिकावर अवलंबून राहता शेतात नवनवीन पिकांची लागवड करावी असा विचार सांबरे यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी शेतात गवार, चवळी, सुरण, हळद, स्ट्रॉबेरी, अद्रक यासारखी पिकं घेतली आहेत. तर प्रामुख्याने पीकणाऱ्या भेंडीने पोई गावाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले.

सध्या त्यांनी शेतात झेंडूच्या फुलांची लागवड केली. झेंडूच्या फुलांची शेती कोरडवाहू जमिनीत केली जाते. मात्र त्यांनी शेतकी तंत्रज्ञान वापरून झेंडूच्या फुलांची शेती केली. आपल्या शेतातील झेंडूची फुल बाजरात नं विकता थेट फुलविक्रेत्यांना विकतात. त्यामुळे झेंडूच्या फुलाच्या माध्यमातून दिवसाकाठी तीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. परिसरातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा फक्त भात आणि भेंडीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करावेत, असे मत सांबरे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

दरम्यान, गुरुनाथ सांबरे यांनी शेती विश्वात केलेल्या नवनवीन प्रयोगामुळे त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला. यामध्ये शासकीय, निमशासकीय खाजगी सामाजिक संस्थांनी सांबरे यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले. झेंडूच्या फुलांच्या प्रयोगानंतर कोल्हापूर प्रमाणे गावात उसाचे पीक घेऊन गुऱ्हाळ सुरू करायचचा संकल्प सांबरे यांनी केला आहे.


हेही वाचा – Pune Water Cut : पुण्यातील पाणीकपात तूर्तास टळली, 15 मेनंतर होणार निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -