घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये कोरोनाबाधित मृतांचा आकडा तीनशेपार

नाशिकमध्ये कोरोनाबाधित मृतांचा आकडा तीनशेपार

Subscribe

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.८) दिवसभरात २68 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण ६9, नाशिक शहर १८७ आणि मालेगावातील १२ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक शहर ४, मालेगाव २ आणि नाशिक ग्रामीणमधील १ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजअखेर ३०६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण नाशिक शहरातील आहेत. जिल्ह्यात एकूण 6 हजार 305 रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात 3 हजार 595 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजवर 3 हजार 836 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 863, नाशिक शहर 1964, मालेगाव 9१३ आणि जिल्ह्याबाहेरील 9६ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार १६३ रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 5२९, नाशिक शहर 1४8२, मालेगाव 12५ आणि जिल्ह्याबाहेरील 2७ रूग्ण आहेत. बुधवारी दिवसभरात 8४5 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय 1६, नाशिक महापालिका रूग्णालय 5४०, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 6, मालेगाव रूग्णालय ९, नाशिक ग्रामीण रूग्णालयात २७४ रूग्ण दाखल झाले.

- Advertisement -

शहरात ३ पुरुष, १ महिला मृत
नाशिक शहरात गुरुवारी दिवसभरात ४ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये सिडको, नाशिक येथील ५२ वर्षीय महिला, महाराणा चौक, सिडको येथील ६२ वर्षीय पुरुष, कुंभारवाडा येथील ६४ वर्षीय पुरुष आणि दसक स्टॉप, सदगुरू मंगल कार्यालय, जेलरोड येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे

नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-6305 (मृत-306)
नाशिक ग्रामीण-1457 (मृत-65)
नाशिक शहर-3595 (मृत-149)
मालेगाव शहर-1117 (मृत-79)
जिल्ह्याबाहेरील-136 (मृत-13)

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -