घरCORONA UPDATEमुंबईमध्ये कोरोनाचे ३०९ नवे रुग्ण; कोरोना बाधितांची संख्या ३७५४ वर

मुंबईमध्ये कोरोनाचे ३०९ नवे रुग्ण; कोरोना बाधितांची संख्या ३७५४ वर

Subscribe

बुधवारीही मुंबईत तब्बल ३०९ रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा ३७५४ वर पोहोचला आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वेगाने वाढ होत असून बुधवारीही मुंबईत तब्बल ३०९ रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा ३७५४ वर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १६० वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ बुधवारीही कायम राहिली. कोरोनाची संख्या वाढत असतानाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून सर्रास बाहेर पडत असल्याने मुंबईतील कोरोनाचा विस्फोट रोखणे अवघड असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्याने ३०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत असून, बुधवारी मुंबईमध्ये ३०९ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३७५४ वर पोहोचला आहे.
तसेच मुंबईमध्ये १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १६० वर पोचली आहे. १० मृत झालेल्या व्यक्तींपैकी ६ जण हे दीर्घकाळ आजारी होते तर चारजण वयोवृद्ध होते.

- Advertisement -

तसेच यामध्ये १४ ते १८ एप्रिलदरम्यान मुंबईतील झालेल्या सात जणांच्या मृत्यूचा अहवाल आल्याने त्यांचा समावेशही करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बुधवारी ३०८ कोरोनाचे संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ७३२८ वर पोहोचली आहे. तसेच १७ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ४२५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. १७  ते १९ एप्रिलदरम्यान विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या कोविड-१९ चाचणीचा अहवालात १२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या १५४ विशेष क्लिनिकच्या माध्यमातून आजपर्यंत ५८३६ जणांचे सर्वेक्षण करून त्यापैकी २१९५ संशयितांचे नमुने घेण्यात आले. तसेच आतापर्यंत ४७ हजार ८२९ इमारतीच्या आवारांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -