घरताज्या घडामोडीकोळसा खाणींचा लिलाव! महाराष्ट्रातील माजरा येथील 31.036 दशलक्ष टन कोळशाचे साठे

कोळसा खाणींचा लिलाव! महाराष्ट्रातील माजरा येथील 31.036 दशलक्ष टन कोळशाचे साठे

Subscribe

केंद्रीय कोळसा मंत्रालयाने सीएमएसपी अर्थात कोळसा खनन (विशेष तरतूद) कायद्याअंतर्गत 13 व्या भागाच्या आणि एमएमडीआर अर्थात खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायद्याच्या तिसऱ्या भागा अंतर्गत व्यावसायिक उत्खननासाठी कोळसा खाणींचे लिलाव सुरु केले. ई-लिलाव पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेत एकूण 10 कोळसा खाणींसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यापैकी 6 कोळसा खाणी सीएमएसपी खाणी आहेत तर उर्वरित एमएमडीआर खाणी आहेत. या सर्व कोळसा खाणींचा तपशील खाली दिला आहे:-

• नऊ कोळसा खाणी पूर्णपणे संशोधित करण्यात आल्या आहेत तर एक खाण अंशतः संशोधित केली आहे.

- Advertisement -

• या सर्व खाणींमध्ये एकूण 1716.211 दशलक्ष टन भूगर्भीय कोळसा साठा आहे.

• या कोळसा खाणींची एकंदर पीआरसी 22.014 दशलक्ष टन प्रती वर्ष आहे.

- Advertisement -

या लिलाव प्रक्रियेत महाराष्ट्रातील माजरा येथील कोळसा खाणीचा समावेश आहे. या ठिकाणी 31.036 दशलक्ष टन भूगर्भीय कोळशाचे साठे आहेत. या उत्खननासाठी 72 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करावी लागणार असून त्यातून 76.26 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळणार आहे.

व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील वर उल्लेखित 10 कोळसा खाणींच्या लिलावासह एकूण 42 कोळसा खाणींचे लिलाव यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत आणि त्यांची पीआरसी प्रती वर्ष 86.404 दशलक्ष टन इतकी आहे.


हेही वाचा : संविधान वाचवण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज, पल्लम राजू यांचं आवाहन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -