घरमहाराष्ट्रPPF आणि सुकन्या योजनेतील गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी, 31 मार्चपूर्वी ही कामे करा...

PPF आणि सुकन्या योजनेतील गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी, 31 मार्चपूर्वी ही कामे करा पूर्ण

Subscribe

तुम्ही पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेचे खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

तुम्ही पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेचे खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. ३१ मार्चपूर्वी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेधारकांनी त्यांच्या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवणे फार महत्वाचे आहे. तसं न केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. तुमच्याकडे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाते असल्यास या आर्थिक वर्षात पैसे जमा करू शकले नाहीत तर तुमचे खाते बंद होऊ शकते. यासाठी ३१ मार्चपर्यंत त्यात काही पैसे ठेवा.

खरं तर मार्च महिना सुरू होताच अनेक आर्थिक कामांची मुदत जवळ येते. जर तुम्ही पीपीएफ आणि सुकन्या योजना खातेधारक असाल आणि या आर्थिक वर्षात तुमच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत, तर हे काम आजच करून टाका, अन्यथा तुमचे खाते बंद केले जाईल.

- Advertisement -

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेंतर्गत प्रत्येक खातेदाराला एका वर्षात ५०० रुपयांपासून कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. तुम्ही या योजनेत जमा केलेल्या पैशावर आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवण्यासाठी क्लेम करू शकता. जर तुम्ही वर्षभरात या योजनेत एक रुपयाही गुंतवला नसेल तर हे काम आजच करा. अन्यथा ३१ मार्च नंतर तुमचे खाते बंद केले जाईल. ते पुन्हा चालू करण्यासाठी, तुम्हाला प्रति वर्ष ५० रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही हे अकाउंट मॅच्युरिटीच्या १५ दिवस आधी चालू करू शकता. अकाउंटची मॅच्युरिटी झाल्यानंतर ते पुन्हा चालू करता येत नाही.

इतका व्याजदर PPF खात्यात उपलब्ध आहे-
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही १५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता आणि मॅच्युरिटीवर मोठा निधी मिळवू शकता. देशातील प्रत्येक नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या खात्यात १५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. मॅच्युरिटीनंतर तुम्ही तुमची गुंतवणूक मर्यादा ५ वर्षांसाठी वाढवू शकता. या खात्यात गुंतवणूक केल्यावर खातेदारांना ७.१ टक्के व्याज मिळते.

- Advertisement -

पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर खातेधारक कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. पीपीएफमध्ये सलग तीन वर्षे गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेच्या ७५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळवू शकता. त्याचबरोबर खात्यात सतत ६ वर्षे गुंतवणूक केल्यानंतर अंशतः पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. मॅच्युरिटीपूर्वी पीपीएफ खात्यातून पैसे काढणे केवळ या अटीवर केले जाऊ शकते की तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उपचारासाठी किंवा तुमच्या आजारपणासाठी, मुलांचे शिक्षण आणि लग्नाचा खर्च यासाठी पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -