घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये तीन बाधितांचा मृत्यू; नवे ३२ रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये तीन बाधितांचा मृत्यू; नवे ३२ रूग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाने धुमाकूळ घातला असून, बुधवारी (दि.१०) दिवसभरात ३२ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १२, नाशिक शहर १२, मालेगाव ४, जिल्ह्याबाहेरील ४ रूग्णांचा समावेश आहे. नाशिक शहर, नाशिक ग्रामीणसह जिल्ह्याबाहेरील तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७०८ रूग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात ४९६ बाधित आहेत.

जिल्हा प्रशासनास बुधवारी दिवसभरात तीन टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात सहा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सुरगाणा १, येवला १, चोपडा जळगाव १, मनमाड १, माडसांगवी येथील २ रूग्णांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात १२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. यामध्ये नाशिक शहरातील लेखानगर १, भवानीरोड, नाशिक रोड १, बडी दर्गा १, बजरंगनर, आनंदवली १, भद्रकाली १, अंबड लिंक रोड, सातपूर १, येवाला १, इतपुरी १, सिन्नर तालुक्यातील पाथरे १, दोडी १, जामगाव १ आणि नायगाव येथील ३ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तिसर्‍या टप्प्यात शहरातील ६ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये अजमेरी चौक २, भाभानगर २, सुभाष रोड व अशोका मार्ग येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील एकूण १ हजार ७०८ करोनाबाधित रूग्णांपैकी १ हजार १३० रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १८८, नाशिक शहर १८३, मालेगाव ७१२, जिल्ह्याबाहेरील ४७ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १८३ संशयित रूग्ण दाखल झाले. यामध्ये जिल्हा रूग्णालय १२, नाशिक महापालिका रूग्णालये १०३, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय २७, मालेगाव महापालिका रूग्णालये १०, नाशिक ग्रामीण रूग्णालय ३०, गृह विलगीकरण येथील एकाचा समावेश आहे.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रूग्ण-१७०८ (मृत-१०५)
नाशिक शहर-४९९ (मृत-२३)
नाशिक ग्रामीण-२८५ (मृत-१२)
मालेगाव शहर-८५८ (मृत-६४)
जिल्ह्याबाहेरील-६९ (मृत-६)

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -