Nashik corona update : 326 नवे रूग्ण कोरोनाबाधित; 10 रूग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात सोमवारी (दि.27) दिवसभरात 326 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 95, नाशिक शहर 219, मालेगाव 11 आणि जिह्याबाहेरील एका रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १0 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक शहर ६ आणि नाशिक ग्रामीणमधील चार रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात 12 हजार 488 वर पोहचला आहे. एकट्या नाशिक शहरात 7 हजार 919 रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक महानगरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दिवसेंनाशिक जिल्ह्यात आजवर ९ हजार 298 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण २ हजार 105, नाशिक शहर ५ हजार 970, मालेगाव 1 हजार 90 आणि जिल्ह्याबाहेरील १३3 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 723 रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 933, नाशिक शहर 1 हजार 696, मालेगाव 89 आणि जिल्ह्याबाहेरील ५ रूग्ण आहेत. सोमवारी दिवसभरात 913 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय 4, नाशिक महापालिका रूग्णालय 520, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय १1, मालेगाव रूग्णालय 9, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 218 रूग्ण दाखल झाले.

नाशिक कोरोना अपडेट

पॉझिटिव्ह रूग्ण-12,488 (मृत-467)
नाशिक ग्रामीण-3149 (मृत-111)
नाशिक शहर-7919 (मृत-253)
मालेगाव शहर-1263 (मृत-84)
जिल्ह्याबाहेरील-157 (मृत-19)