घरताज्या घडामोडीमुंबईतील ३३७ अतिधोकादायक इमारतींमधील हजारो नागरिकांचा जीव टांगणीला

मुंबईतील ३३७ अतिधोकादायक इमारतींमधील हजारो नागरिकांचा जीव टांगणीला

Subscribe

मुंबई शहर व उपनगरे भागातील तब्बल ३३७ जुन्या इमारती या अतिधोकादायक स्थितीत आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारत अथवा इमारतींचे लहान- मोठे भाग कोसळण्याच्या किमान १५० दुर्घटना घडत असतात. त्यामध्ये जीवित व वित्तीय हानी होत असते. या ३३७ अतिधोकादायक इमारतींपैकी शहर भागात ७०, उपनगरे भागात २६७ अतिधोकादायक इमारती आहेत. महापालिकेने या अतिधोकादायक इमारती दुर्घटना घडण्यापूर्वी तात्काळ खाली करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन सदर इमारतींमधील रहिवाशांना केले आहे.

या ३३७ अतिधोकादायक स्थितीतील काही इमारती या ३० वर्षांपेक्षाही जास्त जुन्या आहेत तर काही इमारती या ३० वर्षांपेक्षाही कमी आयुर्मान असूनही अतिधोकादायक स्थितीत आल्या आहेत. कदाचित निकृष्ट बांधकाम केल्यामुळे अशा इमारती धोकादायक स्थितीत आल्या असाव्यात. मात्र सदर इमारतींमध्ये राहणारे रहिवाशी काही आर्थिक कारणामुळे, तर काही भाडेकरू असल्याने आणि काही जणांना पर्यायी घरे मिळण्याची शक्यता वाटत नसल्याने ते या अतिधोकादायक इमारती खाली करायला तयार नाहीत. त्याचप्रमाणें, जवळजवळ १०० – १५० इमारतींची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याचे समजते. तसेच, राज्य सरकार, मुंबई महापालिका, इतर प्राधिकरणे या अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासत्यामुळे अशा इमारतींबाबत दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तीय हानी होण्याची जास्त शक्यता असते.

- Advertisement -

या ३३७ अतिधोकादायक इमारतींपैकी शहर विभागात ७०, पूर्व उपनगरात १०४ तर पश्चिम उपनगरात१६३ इमारती आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या ३३७ इमारतींची यादी महापालिकेने जाहीर केली असून ही यादी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर उपलब्ध आहे. या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱया नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार आणि उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) चंदा जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळापूर्व विविध कामे आणि उपाययोजना केल्या जातात. नाल्यांमधून गाळ काढणे, रस्ते दुरुस्ती यांच्यासोबतच मुंबई महानगरातील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करुन त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते. यंदादेखील पालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. तपासणीअंती २५ एप्रिल रोजी अंतिम केलेली सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर ‘इतर संकेतस्थळं / Relevant Websites’ या सदरामध्ये ही यादी नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

- Advertisement -

शहर विभागात ७० इमारती

शहर भागातील अतिधोकादायक घोषित करण्यात आलेल्या ७० इमारतींमध्ये, ‘ए’ विभाग – ४, ‘बी’ विभाग – ४, ‘सी’ विभाग – १, ‘डी’विभाग – ४,’ ई’ विभाग – १२, ‘एफ/दक्षिण’ विभाग – ५, एफ/उत्तर विभाग – २६, जी/दक्षिण विभाग – ४ आणि जी/उत्तर विभाग – १० अशा विभागनिहाय इमारतींचा समावेश आहे.

पश्चिम उपनगरात १६३ इमारती

पश्चिम उपनगर भागातील अतिधोकादायक घोषित करण्यात आलेल्या १६३ इमारतींमध्ये, ‘एच/पूर्व’ विभागात – ९, ‘एच/पश्चिम’ – ३०, ‘के/पूर्व’ विभागात – २८, ‘के/पश्चिम’ विभागात – ४०, ‘पी/दक्षिण’ विभागामध्ये – ३, ‘पी/उत्तर’ विभागात – १३, ‘आर/दक्षिण’ विभागात – १०, ‘आर/मध्य’ विभागामध्ये – २२ आणि ‘आर/उत्तर’ विभागात – ८ इमारती सी-१ श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत.

पूर्व उपनगरातील १०४ इमारती

पूर्व उपनगर भागात घोषित केलेल्या अतिधोकादायक १६३ इमारतींमध्ये,’ एम/पश्चिम’ विभागात – १६, ‘एम/पूर्व’ विभागामध्ये – १, ‘एल’ विभागात – १२, ‘एन’ विभागात – २०, एस विभागात ६ आणि टी विभागात ४९ इमारतींचा समावेश आहे.

अतिधोकादायक इमारतींमधील काही लक्षणे  – 

# इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे.

# इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे.

# इमारतीचा तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे.

# इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे.

# इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.

# इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे.

# इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे.

ज्या इमारती ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरीता वापरात आहेत, अशा इमारतींची महापालिका प्रशासनाकडे नोंदणीकृत असलेल्या संरचनात्मक अभियंत्यांद्वारे परीक्षण करुन घेणे अनिवार्य आहे. सदर यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६ / २२६९४७२५ / २२६९४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


हेही वाचा : Bird flu in Human : नवं टेन्शन! चीनमध्ये चार वर्षांच्या मुलाला बर्ड फ्ल्यूची लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -