घरठाणेराज्यात 3482 नव्या कोरोना रुग्णांची भर; मुंबईत 1210 रुग्ण बाधित

राज्यात 3482 नव्या कोरोना रुग्णांची भर; मुंबईत 1210 रुग्ण बाधित

Subscribe

कोरोनाच्या रुग्णांच्या (Coronavirus Patients) संख्येत मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. अशातच आज राज्यात 3 हजार 482 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

कोरोनाच्या रुग्णांच्या (Coronavirus Patients) संख्येत मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. अशातच आज राज्यात 3 हजार 482 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण (Coronavirus) हे मुंबईत आढळले आहेत. त्यानुसार, मुंबईत आज 1 हजार 210 रुग्णांची भर पडली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आज कोरोनातून (Covid 19) बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा जास्त आहे. त्यानुसार, आज दिवसभरात एकूण 3 हजार 566 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (3482 new corona patients in maharashtra and 1210 patients in mumbai today)

- Advertisement -

कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी, राज्यात कोरोनामुळे मृतांचाही आकडा वाढतो आहे. आज राज्यात 5 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तसेच राज्यात आतापर्यंत 77 लाख 91 हजार 555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतके झाले आहे.

बी ए.5 आणि बी ए. 4 व्हेरीयंटच्या रुग्णांमध्ये वाढ

- Advertisement -

राज्यात बीए 5 व्हेरीयंट आणि बीए 4 व्हेरीयंटचे 9 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये 6 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत आढळललेल्या बी ए 5 आणि बी ए. 4 रुग्णांची संख्या 63 झाली आहे. यातील 15 पुण्यातील, मुंबईतील 33, नागपूर, पालघर ठाण्यातील 4 रुग्ण आणि तर रायगडमधील 3 रुग्ण आहेत.

राज्यात आज एकूण 25 हजार 481 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 11 हजार 988 इतके रुग्ण आहेत. तसेच, ठाण्यात 5 हजार 931 सक्रिय रुग्ण आहेत.

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या घटली

गेल्या 24 तासांत नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तर, सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. देशभरात गेल्या 24 तासात 11 हजार 793 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 34 लाख 18 हजार 839 झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 700 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 27 रुग्णांच्या मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 5 लाख 25 हजार 47 वर पोहोचली आहे.


हेही वाचा – राज्यातील सत्तासंघर्षाचा पोलिसांना फटका; २२ जुलैपर्यंत सुट्ट्या रद्द

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -