घरताज्या घडामोडीपुण्यात १०९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ३५ जणांचा मृत्यू

पुण्यात १०९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ३५ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात १ हजार ९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात १ हजार ९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता ७० हजार ३२६ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार ६५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर उपचार घेणाऱ्या १ हजार १५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५३ हजार ९५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ९४६ रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात ९४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २४ रुग्ण हे महापालिकेच्या हद्दीबाहेरील आहेत. तर २० जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३२ हजार ५६५ वर पोहचली आहे. यांपैकी, २२ हजार ४५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिवसभरात ४४८ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

शहरात आतापर्यंत ६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश असून महापालिकेच्या रुग्णालयात ५ हजार ८५३ सक्रिय रुग्ण संख्या आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात ११,८१३ नव्या रुग्णांची नोंद, ४१३ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -