Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ४५ दिवसांपैकी २५ दिवस व्हेंटिलेटरवर, महिलेने मिळवली कोरोनावर मात

४५ दिवसांपैकी २५ दिवस व्हेंटिलेटरवर, महिलेने मिळवली कोरोनावर मात

Related Story

- Advertisement -

कोरोना म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक भीती निर्माण होते. पण अनेकजण या भीतीवर मात करून कोरोनाला हरवतात. अशीच घटना नागपूरमध्ये घडली आहे. एक ३५ वर्षीय महिला ४५ दिवस कोरोना व्हायरससोबत लढत होती. या ४५ दिवसांमध्ये तिला २५ दिवस व्हेंटिलेटवर ठेवले होते. अखेरिस तिने कोरोनाची लढाई जिंकली आणि आपल्या ५ वर्षाच्या मुलीला जाऊन भेटली. नागपूरमधील राहणारी ही महिला स्वप्ना रसिक हिचा जीव वाचला, हे डॉक्टरांसाठी चमत्कारिक होते. २५ दिवस व्हेंटिलेटवर राहूनही पूर्णपणे ठिक होणे हे आरोग्य जगतात आश्चर्य करणारी गोष्ट आहे.

स्वप्ना म्हणाली की, ‘मी माझी मुलगी लोरिनाबद्दल विचार करत होती. तिच्यामुळे मला प्रेरणा मिळाली आणि शेवटी मी जिवंत वाचली.’ स्वप्नावर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की, ‘जेव्हा स्वप्ना थोडी शुद्ध यायची, तेव्हा ती आपल्या मुलीबाबत बोलत असे आणि विचारत असे.’

दोन्ही फुफ्फुसांमध्ये झाला होता संसर्ग

- Advertisement -

१९ एप्रिलला स्वप्ना कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. २४ एप्रिलला तिची प्रकृती गंभीर होत गेली तिला रुग्णालयात दाखल केले गेले. तेव्हा तिच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये व्हायरसचा संसर्ग पसरला होता. तिचा SpO2 स्तर ८०पेक्षा कमी होता आणि ठीक होत नव्हता.

स्वप्नाचे डॉक्टर परिमल देशपांडे म्हणाले की, ‘ऑक्सिजन थेरेपी करूनही तिचे SpO2 लेव्हल सुधारत नव्हती. यामुळे व्हेंटिलेटवर ठेवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. या व्हेंटिलेटरचा वापर १०० टक्के क्षमतासोबत २५ दिवसांपर्यंत केला गेला. हे एक दुर्मिळ प्रकरण आहे. कोणतीही व्यक्ती २५ दिवस व्हेंटिलेटवर राहून ठिक होणे खूप कठीण असते.’

- Advertisement -

उपचार करणारी टीमचे नेतृत्व करणारे डॉक्टर अशोक अर्बत म्हणाले की, ‘त्याच्या उद्देश आईला वाचवण्याचा होता. स्वप्नाचे पती एका खासगी कंपनीत काम करतात. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर स्वप्नाला पुढील सात दिवस होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर ती आपल्या मुलगीला भेटली.’

 


हेही वाचा – Monkypox: कोरोनानंतर जगाला आता ‘मंकीपॉक्स’चा धोका, नेमका आहे कसा हा विषाणू?


 

- Advertisement -