घरमहाराष्ट्रनरवीर तानाजी मालुसरे यांची 350 वी पुण्यतिथी

नरवीर तानाजी मालुसरे यांची 350 वी पुण्यतिथी

Subscribe

समाधी स्थळ नूतीनकरणाच्या कामाला वेग

नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावात असलेल्या त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे. तानाजी मालुसरे यांची 350 वी पुण्यतिथी येत्या 17 फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे.

पोलदपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर उमरठ गाव आहे. या ठिकाणी इतिहासप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केल्यानंतर युद्धात धारतीर्थ पडले. त्यांचे पार्थिव कोंढाणा किल्ल्यावरून मडेघाट मार्गे उमरठ येथे आणण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीशेजारी शेलार मामा यांचीही समाधी आहे. स्व. प्रभाकर पाटील रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी या समधीचे नूतनीकरण केले होते. तसेच जिल्हा परिषदेचे विश्रामगृहही बांधले.

- Advertisement -

यंदा नरवीर तानाजी मलुसरे यांची 350 वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे या समाधीचे नूतीनकरण केले जात आहे. तसेच आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण केले जात आहे. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या विविध विभागांतर्फे या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सध्या समाधीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी खास कर्नाटकातून दगड मागविण्यात आले आहेत. कोल्हापूरचे कारागीर समाधीच्या नूतनीकरणाचे काम करत आहेत. समाधी परिसराला किल्ल्यासारखी तटबंदी करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास साकार करण्यात येणार आहे.

तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमरठला यावे असा प्रयत्न आहे. ‘तान्हाजी द वारियर’ सिनेमाचे दिगदर्शक ओमी राऊत यांना नरवीर तानाजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार 17 फेब्रुवरी रोजी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अजय देवगण, काजोल देवगण, देवदत्त नागे, शरद केळकर आणि इतर कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्सव समितीचे सदस्य रामदास कळंबे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -