CoronaVirus: गेल्या २४ तासांत ३५१ पोलिसांना कोरोनाची लागण; आतापर्यंत १४२ जणांचा मृत्यू

देशासह राज्यात कोरोनाचा सातत्याने वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. या कोरोनाच्या संसर्गाचा सामना आता कोरोना योद्ध्यांना देखील करावा लागताना दिसत आहे. कारण या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. राज्यात गेल्या २४ तासात ३५१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

यामुळे राज्यात आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या १४ हजार ६७ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत १४२ इतका मृतांचा आकडा झाला आहे. दिलासादायक म्हणजे ११ हजार ३५६ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले असल्याचे सांगितले जात आहे. तर सध्या २ हजार ५६९ पोलीस कर्मचाऱी अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे.

भारतातील रुग्णांनी ३१ लाखांचा टप्पा ओलांडला

भारतातील कोरोना रुग्णांनी ३१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी ६० हजार ९७५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे संसर्गातून बरे होणार्‍या लोकांची संख्या २४ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या २४ तासांत ६० हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळल्याने देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा ३१ लाख ६७ हजार ३२४ पर्यंत पोहोचला आहे तर सध्या ७ लाख ४ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.


CoronaVirus in India: गेल्या २४ तासांत ६०,९७५ नवे रूग्ण; ८४८ जणांचा मृत्यू