घरCORONA UPDATEICU बेडअभावी एकाच महिन्यात ३६५ कोरोनाबाधितांनी सोडले प्राण, नागपूरात परिस्थिती चिंताजनक

ICU बेडअभावी एकाच महिन्यात ३६५ कोरोनाबाधितांनी सोडले प्राण, नागपूरात परिस्थिती चिंताजनक

Subscribe

रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू

राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूर जिल्ह्याला कोरोने विळखा घातला आहे. राज्यात ऑक्सिजन बेड, इंजेक्शनचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत नागपूरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. नागपूरात केवळ एप्रिल महिन्यात नागपूरात ICU बेडअभावी ३६५ कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. २७ एप्रिलपर्यंत नागपूरात ९८७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ICU मध्ये ४८५ रुग्ण दगावले गेले. तर १२८ रुग्णांचा कॅज्युअल्टीमध्ये मृत्यू झाला आहे. रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल आता नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. संपूर्ण नागपूर कोरोनाच्या भयानक परिस्थितीमुळे हादरले आहे.

नागपूरात कोरोनाची परिस्थिती पाहता सुरुवातीलात काही कठोर निर्बंध लादण्याची गरज होती. मात्र असे न झाल्याने नागपूरकरांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे संकट ओढावले आहे. नागपूर रुग्णालयात १ हजार ऑक्सिजन बेड वाढवले जाणार होत्या मात्र ही बाब कोणीही गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. नागपूरची लोकसंख्या ही ३५ लाख इतकी आहे. ३५ लाख लोकांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ ३५० ICU बेड उपलब्ध आहेत. नागपूरात सध्याच्या घडीला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात ९० ICU बेड उपलब्ध आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४५ ICU बेड उपलब्ध आहेत.

- Advertisement -

राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. ऑक्सिजन बेड नसल्याने अनेकांना परत पाठविण्यात येत आहे. नागपूरातही ICU बेड नसल्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव HDU वॉर्डमध्ये ठेवण्यात येते. एप्रिल महिन्यात नागपूरात HDU वॉर्डमध्ये ३६५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021 : महाबळेश्वरात अनिल अंबानींच्या इव्हिनिंग वॉकवर CEO च्या दणक्यानंतर बंदी

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -