Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट, २४ तासांत ३६७ नव्या कोरोना रूग्णांची नोंद

India Corona Update 3,33,533 new COVID cases found and 525 deaths in 24 hours

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येचा आकडा खालावत चालला आहे. त्यामुळे राज्य आणि मुंबईकरांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संखेत घट होत असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासांत मुंबईत ३६७ इतक्या नव्या रूग्णांची वाढ झाली असून १ कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत आजचा रिकव्हरी रेट वाढला आहे.

गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ३६७ रूग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण रूग्णांची संख्या १ लाख ५३ हजार ४१३ इतकी आहे. तर एकूण मुंबईतील मृतांचा आकडा १६ हजारांच्या वर गेला आहे. तसेच मागील २४ तासांत मुंबईत ३४ हजार ४४३ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर एकूण चाचण्यांचा आकडा १५७,२६,७४९ इतका आहे. मुंबईत एसिम्पटोमॅटीक रूग्णांची संख्या ३१६ इतकी आहे. तर एकूण संख्या ७३८,४५५ इतकी झाली आहे.

मुंबईतील बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका असून ८४१ इतके रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सक्रिय रूग्णांची एकूण संख्या ३ हजार २१९ इतकी आहे. ऑक्सिजन बेडवरील रूग्णांची संख्या १४ आहे. ४ फेब्रवारी २०२१ ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०७ टक्के इतका आहे.

राज्यातील आकडेवारी काय?

राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ४५५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ३५ हजार ८८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार ९०२ सक्रीय रुग्ण आहेत.