मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून आठ महिन्यात पाच हजार रुग्णांना 38 कोटींची मदत

गेल्या काही महिन्यातील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या आठ महिन्यांत कक्षाकडून 4 हजार 800 रुग्णांना एकूण 38 कोटी 60 लाख रुपयांची मदत दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत देण्यात आली आहे.

38 crores help to 5000 patients in eight months from CM Medical Assistance Unit

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. गेल्या काही महिन्यातील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या आठ महिन्यांत कक्षाकडून 4 हजार 800 रुग्णांना एकूण 38 कोटी 60 लाख रुपयांची मदत दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून या योजनेचे मूळ संकल्पक तथा कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकार येताच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रमी 10 कोटी 27 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो असे कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – हायकोर्टाचा विमा कंपनीला दणका : जुळ्या मुलांच्या उपचार खर्चाचे मातेला मिळणार १६ लाख रुपये

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मंगेश चिवटे यांनीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली होती. राज्यातील गरजू रुग्णांना मदत करण्याच्या हेतूने सरकारच्या माध्यमातून हा कक्ष उभा राहिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिवटे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले होते. पत्रकारितेसोबतच आरोग्य दूत म्हणून मंगेश चिवटे यांनी रुग्णसेवेत काम सुरू केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून मंगेश चिवटे यांनी जबाबदारी सांभाळली.