घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये नवे ३८ रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये नवे ३८ रूग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने नाशिक शहरातील रस्ते, बाजारपेठा गर्दीने वाहत आहेत. परिणामी, मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातील जुने नाशिक, वडाळागाव, पेठ रोड करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. प्रशासनास मंगळवारी (दि.९) नवीन ३८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात नाशिक शहर २२, नाशिक ग्रामीण ८, मालेगाव ३ आणि भिवंडी, मुंबई येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ६७२ करोनाबाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात ४८० रूग्ण आहेत. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात ३ बाधितांचा मृत्यू झाल्याने, एकूण मृतांचा आकडा शंभरावर गेला आहे.

जिल्हा प्रशासनास मंगळवारी तीन टप्प्यांत अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात नाशिक ग्रामीणमधील १४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये दोन रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, १२ अहवाल निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह रूग्णामध्ये येवला येथील ७२ वर्षीय पुरुष व पिंपळगाव (ता.निफाड) येथील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात नाशिक शहरातील भाभानगर १, सारडा सर्कल १, पेठ रोड ३, दिंडोरी रोड १, महात्मानगर १, बागवानपुरा १ आणि बॉम्बे हॉटेल, इगतपुरी येथील एकाचा समावेश आहे. तिसर्‍या टप्प्यात नाशिक शहरातील १९ नवीन रूग्ण बाधित आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यातील १ हजार ६७२ बाधित रूग्णांपैकी १ हजार ९३ रूग्ण बरे झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १७३, नाशिक शहर १६८, मालेगाव ७०७, जिल्ह्याबाहेरील ४५ रूग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात १८९ संशयित रुग्ण विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय १४, नाशिक महापालिका रूग्णालये १२०, मालेगाव रूग्णालय १४, नाशिक ग्रामीण रूग्णालयात ४१ रूग्ण दाखल झाले आहेत.

- Advertisement -

शहरात सहा ठिकाणी निर्बंध, एक निर्बंधमुक्त
शहरात मंगळवारी नवीन रूग्ण बाधित आढळून आले. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने रूग्ण राहत असलेल्या सहा इमारती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या आहेत. यामध्ये भाभानगर, शिवमनगर-पंचवटी, सरदार चौक-पंचवटी, पारिजातनगर, गायकवाडनगर, लोणार गल्ली-रविवार कारंजा या भागातील इमारतींचा समावेश आहे. तर, सरस्वतीनगर, पंचवटी येथील एक इमारत १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने, निर्बंधमुक्त करण्यात आली.

नाशिक शहरातील रूग्ण असे…
भाभानगर १, सारडा सर्कल १, दिंडोरी रोड १ , महात्मानगर १, बागवानपुरा १, टाकळी रोड २, जयदीपनगर १, सरदार चौक, पंचवटी २, नाग चौक २, सातपूर कॉलनी २, काठे मळा २, आझाद चौक १, पंचवटी १, फुलेनगर १, नाईकवाडीपुरा १, काद्री चौक २, अमरधाम रोड १, भिवंडी १.

- Advertisement -

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रूग्ण-१६७२ (मृत-102)
नाशिक शहर-4८० (मृत-२2)
मालेगाव शहर -854 (मृत-64)
नाशिक ग्रामीण-273 (मृत-11)
जिल्ह्याबाहेरील-65 (मृत-५)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -