Eco friendly bappa Competition
घर क्राइम 3847 कोटींचे कर्ज बुडवल्याच्या आरोपाखाली अवर्सेकांवर गुन्हा; उद्धव ठाकरेंसोबतचे कनेक्शन चर्चेत

3847 कोटींचे कर्ज बुडवल्याच्या आरोपाखाली अवर्सेकांवर गुन्हा; उद्धव ठाकरेंसोबतचे कनेक्शन चर्चेत

Subscribe

युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि कंपनी मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.

मुंबई : एकीकडे विघ्नहर्ता गणरायांच्या आगमनाची लगबग सुरू असताना दुसरीकडे मात्र, सीबीआयच्या छापेमारीची घटना समोर आली आहे. विविध बॅंकांचे तब्बल 3847 कोटी रुपये बुडवल्याच्या आरोपीखाली किशोर अवर्सेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेचे उद्धव ठाकरेंसोबतचे कनेक्शन समोर आले आहे.(3847 crore loan default case against defaulters Connection with Udhav Thackeray in discussion)

युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि कंपनी मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. मात्र, याच कंपनीचे संचालक किशोर अवर्सेकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर सीबीआयने छापेमारी केली असून, गुन्हा देखील दाखल केला आहे. किशोर अवर्सेकर यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियासह (SBI) इतर 15 बँकांचे सुमारे 3847 कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप आहे. याप्रकरणामध्ये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मातोश्री निवासस्थानाचे केले होते नूतनीकरण

- Advertisement -

युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि कंपनीचे संचालक हे नुसते उद्योजकच नव्हे तर ते काही राजकीय नेत्यांचे ते निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. मात्र त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. तर अवर्सेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानचेही नूतनीकरण केले होते. त्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.

 

गुन्हेगारी कट रचून केला मोठा फ्रॉड

- Advertisement -

युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि कंपनीचे संचालक किशोर अवर्सेकर यांनी काही शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारी कट रचून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांच्या समूहांची 3847 कोटी 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एसबीआयच्या वतीने उपमहाव्यवस्थापक रजनी ठाकूर यांनी केली होती. युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडने एसबीआय आणि इतर बँकांकडून विविध सुविधांद्वारे कर्ज घेतले होते. ते बुडीत निघाल्यामुळे बँकांचे सुमारे 3,847 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

हेही वाचा : शिंदे -फडणवीस सरकारच्या काळात महिला सुरक्षेत मुंबईचा क्रमांक चिंताजनक; तुमचे शहर कोणत्या क्रमांकावर?

यांच्यावर करण्यात आला गुन्हा दाखल

रजनी ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आधी प्राथमिक चौकशी चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किशोर अवर्सेकर, उपाध्यक्ष अभिजीत अवर्सेकर, कार्यकारी संचालक आशिष अवर्सेकर आणि संचालक पुष्पा अवर्सेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : ‘नावातच ‘सत्ता’, म्हणून मी सत्तेत; अब्दुल सत्तारांनी सांगितलं सत्ताकारण

फक्त मातोश्रीच नव्हे तर हे प्रकल्प लावले होते मार्गी

अवर्सेकर यांच्या युनिटी इन्फ्रा प्रोजेक्टस लिमिटेडने कलानगर येथील ठाकरे कुटुंबीयांचा मातोश्री बंगला, दादर टीटी उड्डाणपूल आणि सीएसएमटी येथील भुयारी मार्गाचे बांधकाम तसेच आगीत नुकसान झालेल्या मंत्रालयाच्या इमारतीचे नूतनीकरण केले होते.

- Advertisment -