घरताज्या घडामोडीनाशिक शहरात ३९ नवे रूग्ण पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

नाशिक शहरात ३९ नवे रूग्ण पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

Subscribe

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, शनिवारी (दि.१३) दिवसभरात जिल्ह्यात ५१ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात सर्वाधिक 39 रुग्ण नाशिक शहरातील आहेत. शनिवारी दिवसभरात महापालिकेचे माजी नगरसेवक बिलाल खतीब (६२) यांचे करोना आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते. प्रारंभी त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, हळूहळू प्रकृती खालावत गेली. शनिवारी (दि. १३) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ हजार ८६८ वर गेली असून, एकट्या नाशिक शहरात 607 बाधित रूग्ण आहेत.

कोकणीपुरात वयोवृद्ध बाधित
कोकणीपुरा, जुने नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कातील रूग्णांना क्वारंटाईन केले आहे.

- Advertisement -

हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील रूग्ण बाधित
त्रंबक गेट, नाशिक येथील २५ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. चौक मंडई,मदिना ज्वेलर्स समोर, जुने नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्धाचा व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चामुंडा विहार, निळकंठेश्वर मंदिर, अशोक नगर, सातपूर येथील ५० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सारडा सर्कल येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भाभा नगर, मुंबईनाका येथील ४७ वर्षीय महिला व ७७ वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या जुन्या रुग्णांच्या संपर्कातीलआहेत. रोहिणी नगर,पेठरोड येथील ३५ व ७१ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या दोघी एकाच परिवारातील आहेत. उस्मानिया चौक,पखाल रोड येथील ५० वर्षीय पुरुष कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -