घरताज्या घडामोडी३९८ नवे रूग्ण : येवल्यातील आमदार कोरोनाबाधित

३९८ नवे रूग्ण : येवल्यातील आमदार कोरोनाबाधित

Subscribe

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.१९) दिवसभरात 398 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 78, नाशिक शहर ३११, मालेगाव 8 आणि जिल्ह्याबाहेरील १ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक शहर ३ आणि नाशिक ग्रामीणमधील ४ रूग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, येवल्यातील विधान परिषदेच्या आमदारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारअखेर जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ९ हजार ४१९ वर पोहचला आहे. एकट्या नाशिक शहरात ५ हजार ७२२ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात आजवर 6 हजार 351 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण १409, नाशिक शहर 3 हजार ७९२, मालेगाव 1030 आणि जिल्ह्याबाहेरील १२0 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 678 रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 825, नाशिक शहर 1 हजार 725, मालेगाव 85 आणि जिल्ह्याबाहेरील 43 रूग्ण आहेत. रविवारी दिवसभरात 1550 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय 8, नाशिक महापालिका रूग्णालय 776, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 9, मालेगाव रूग्णालय 19, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 298 रूग्ण दाखल झाले.

- Advertisement -

महानगरात तीन रूग्णांचा मृत्यू
नाशिक महानगरात रविवारी (दि.१९) तीन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. दिंडोरी रोड, पंचवटी येथील ५५ वर्षीय पुरुष, सावित्रीबाई फुलेनगर, वडाळा येथील ६० वर्षीय पुरुष आणि भारतनगर येथील ४३ पुरुषचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

७९९ अहवाल प्रलंबित
नाशिक जिल्ह्यात रविवारअखेर ३४ हजार ७७७ संशयित रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ९ हजार ४ ४१९ रूग्ण कोरोनाबाधित असून ७९९ संशयित रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात नाशिक ग्रामीण 484, नाशिक शहर 230 आणि मालेगावमधील ८५ रूग्णांचा आहे.

- Advertisement -

नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-9419 (मृत-390)
नाशिक ग्रामीण-2321 (मृत-87)
नाशिक शहर-5722 (मृत-205)
मालेगाव शहर-1197 (मृत-82)
जिल्ह्याबाहेरील-179 (मृत-16)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -