घरताज्या घडामोडीऔरंगाबादमधील ४ नगरसेवक शिंदे गटात, शिवसेनेला मोठा झटका

औरंगाबादमधील ४ नगरसेवक शिंदे गटात, शिवसेनेला मोठा झटका

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत.शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. औरंगाबादमधील शिवसेनेचे ४ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

माजी नगरसेवक राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाठ, वर्षाराणी वाडकर आणि विकास जैन हे चार नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. परंतु या चार नगरसेवकांनंतर आणखी १० ते १२ नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

औरंगाबाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यासाठी प्रामुख्याने औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघात मोटबांधणीचं काम सुरू याहे. तसेच शिंदे गटाकडून इच्छुकांकडून फॉर्मही भरून घेतले असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी तसे अर्ज भरून दिले आहेत, असं शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी म्हटलंय.

दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. परंतु दोघांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कोर्टाने सांगितले असून दोन्ही वकिलांनी वेळ मागून घेतला आहे. तसेच पुढील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून येत्या १ ऑगस्टला पार पडणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -