घरमहाराष्ट्रअबब...राज्यात ४ लाख ८८ हजार 'नोटा'!

अबब…राज्यात ४ लाख ८८ हजार ‘नोटा’!

Subscribe

लोकसभा निवडणुकीचा निकालावर एक नजर टाकली असता यावेळी राज्यात ४ लाख ८८ हजार ७६६ इतक्या मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.

जर मतपत्रिकेवरील कोणताही उमेदवार पसंत नसेल तर पर्याय म्हणून नोटाचा वापर अर्थात नन ऑफ द अबोव्हचा वापर केला जातो. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीचा निकालावर एक नजर टाकली असता यावेळी राज्यात ४ लाख ८८ हजार ७६६ इतक्या मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. त्यामुळे गेल्या काही  निवडणुकांमध्ये नोटांचे प्रमाण वाढल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पालघरमध्ये सर्वाधिक नोटाचा वापर करण्यात आला असून, २९ हजार ४७९ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला असून, त्या खालोखाल गडचिरोली चिमूर मतदारसंघात २४ हजार ५९९ मतदरांनी नोटाचा पर्याय वापरला आहे. तर सगळ्यात कमी नोटाचा वापर  बीड आणि धुळे या मतदारसंघात झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

सर्वाधिक ‘नोटा’चा वापर झालेले पाच मतदारसंघ

१) पालघर – २९,४७९

- Advertisement -

२) गडचिरोली- चिमुर – २४, ५९९

३) नंदुरबार – २१, ९२५

- Advertisement -

४) ठाणे – २०, ४२६

५) उत्तर-पश्चिम मुंबई – १८,२२५

आदीवासी बहुल भागात वाढलाय नोटा  

दरम्यान, एकंदरीत आकडेवारी पाहिली तर पालघर, गडचिरोली, ठाणे आणि नंदुरबारमध्ये आदिवासी समाज देखील राहत असून, याच भागात नोटाचे प्रमाण वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कदाचित अक्षिक्षित मतदारांना नेमकं बटण कोणते दाबायचे हे कळत नसल्यामुळे ते शेवटचे बटन दाबून मोकळे होत असावे असा अंदाज काही जानकरांनी बोलून दाखवला. तर यंदा व्हिव्हिपॅटमुळे मतदान झाले की नाही हे समजायला सात सेकंद लागत होते आधी ३ सेकंद लागत होते असे देखील काही जानकारांनी सांगितले. तर दुसरीकडे मुंबई सारख्या सुक्षिक्षित भागात देखील नोटाचे प्रमाणे वाढल्याचे पहायला मिळत असून, मुंबईतील दक्षिण मुंबई १५११५, इशान्य मुंबई – १२, ४६६, उत्तर पश्चिम – १८, २२५, दक्षिण मध्य मुंबई – १३,८३४, उत्तर मुंबई – ११, ९६६, उत्तर मध्य मुंबई -१०,६६९ इतक्या मतदारांनी नोटाला पंसती दिली आहे.

हेही वाचा –

राज्यातले  MBBS डॉक्टर पोहोचले लोकसभेत

उद्धव यांच्या मुत्सद्देगिरीने शिवसेनेला तारले

केंद्रात आठवलेंचं मंत्रीपद कायम; तर दानवेंची मंत्रीपदाची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -