घरताज्या घडामोडीनाशकात हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील तरुण करोनाबाधित

नाशकात हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील तरुण करोनाबाधित

Subscribe

नवे रुग्ण : नाशिक शहर २, मालेगाव १, निमोण १

नाशिक शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी बाहेरगावी जाऊन आलेल्यांमुळे रुग्ण आढळण्याचे प्रकार सुरु आहे. मंगळवारी दाट लोकवस्तीच्या वडाळा गावठाणामधील कांदा व्यापारी करोनाबाधित आढळून आल्यानंतर आज त्याच्या संपर्कात आलेला हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील २० वर्षीय तरुण बाधित असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. दरम्यान, प्रशासनास आणखी तिघेजण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये अंबड लिंक रोड परिसरातील ७३ वर्षीय वृध्द व्यक्ती, मालेगाव शहरातील ५० वर्षीय पुरुष आणि निमोण (ता.संगमनेर) येथील ७८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

नाशिक शहरात ६ एप्रिल ते आत्तापर्यंत ५० रुग्ण करोनाबाधित आहेत. त्यापैकी ३७ रुग्ण बरे झाले असून दोनजण मृत झाले आहेत. करोना संसर्गजन्य आजार असल्याने दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे शहरात बाधित रुग्णांचे प्रमाण मालेगावच्या तुलनेत कमी आहे. मंगळवारी (दि.१९) शहरात वडाळा येथे पॉझिटिव्ह आढळून आलेला रुग्ण कांदा व्यापारी असून पिंपळगाव येथून कांदा घेवून ते मुंबईत विक्री करत आहेत. रुग्ण बाधित असल्याचे समजताच आरोग्य विभागाने वडाळा परिसर सील करत संपर्क आलेल्या नातलग व नागरिकांना क्वारंटाइन करत त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील एकाचा अहवाल आज प्रशासनास प्राप्त झाला असून हाय रिस्कमधील २० वर्षीय मुलगा बाधित आढळून आला आहे.

- Advertisement -

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण —-८५९
नाशिक शहर —–५०
नाशिक ग्रामीण —-११२
मालेगाव शहर —–६६६
जिल्ह्याबाहेरील रुग्ण –३१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -