घरमहाराष्ट्रवर्दीचा माज दाखवत चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याने चार पोलीस अधिकाऱ्यांनी गमावली नोकरी

वर्दीचा माज दाखवत चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याने चार पोलीस अधिकाऱ्यांनी गमावली नोकरी

Subscribe

नागपूरात एका युवकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी आणि काळ्या बाजारातील धान्याची गाडी पोलीस ठाण्यात लावून कारवाई करणे चार पोलीस अधिकाऱ्यांच्या चांगलचं अंगलट आले आहे. याप्रकरणी नागपूरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनिष भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पाल आणि शिपाई प्रसेनजित जांभूळकर या चौघांना निलंबित करण्यात आले आहे. एकाच वेळी चार पोलिसांवर निलंबनाच्या कारवाईमुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वर्दीचा माज दाखवत चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याने या चार पोलीस अधिकाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे.

पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे हे यशोधन नगर पोलीस ठाण्याचे डीबी इन्चार्ज ( गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख) आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे सुरु असून गुन्हेगार मात्र मोकाट सुटल्यासारखे वागत होते. तसेच स्थानिक पोलिसांकडूनही या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप सुरु होते. त्यामुळे शहारात अवैध धंदे आणि वसुलीच्या घटनांना पेव फुटले होते. याचदरम्यान २७ ते २८ मेदरम्यान यशोधन पोलिसांनी धान्याचा काळाबाजार सुरु असलेली गाडी जप्त केले आणि पोलीस कारवाईचा धाक दाखवून मोठी वसुली केल्याची चर्चा सुरु झाली.

- Advertisement -

हे प्रकरण शांत होत नाही तोवर नागपूरात एका उच्चशिक्षित तरुणाला बेदम मारहाण केल्याची तक्रार समोर आली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या दोन्ही घटनांची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणातील चौकशीचे अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे सादर केले. यानंतर पीएसआय दराडे, हवालदार मनिष भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पाल आणि शिपाई प्रसेनजित जांभूळकर या चौघांना दोषी ठरवत आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे यशोधन पोलीस ठाण्यात मोठा भूकंप आल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -