घरमहाराष्ट्रराज्याच्या तिजोरीत खडखडाट, ४० हजार कोटींची महसुली तूट!

राज्याच्या तिजोरीत खडखडाट, ४० हजार कोटींची महसुली तूट!

Subscribe

करोनामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था झाली असून तिजोरीत खडखडाट झाल्याचे वास्तव समोर येत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून वस्तू आणि सेवा कर, मुद्रांक शुल्क, अबकारी कर, परिवहन करासह इतर करातून मिळणारा पूर्ण महसूल बंद झाला आहे. राज्याला आतापर्यंत अंदाजे ४० हजार कोटी रुपयांचा महसुली तोटा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मार्च 2019 मध्ये राज्याच्या तिजोरीत 42 हजार कोटी रुपयाचा महसूल जमा झाला होता. मार्च 2020 मध्ये केवळ 17 हजार कोटी महसूल मिळाला, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 60 टक्क्यांची घट झाली. एप्रिल 2019 मध्ये राज्याचे महसुली उत्पन्न 21 हजार कोटी रुपये इतके होते, यावर्षी त्यात 70 टक्क्यांहून अधिक घट होण्याचा अंदाज आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2019 च्या जीएसटी परताव्यापोटी राज्याला केवळ 1800 कोटी रुपये मिळाले. आणखी 5 हजार कोटी अपेक्षित आहेत. सध्या राज्यावर 5 लाख 20 हजार कोटी रुपये एवढे भले मोठे कर्ज आहे. व्याजापोटी आपल्याला महिन्याला 3 हजार कोटी भरावे लागतात.

- Advertisement -

गेल्या वर्षी म्हणजे २०१९-२० या वर्षात राज्य सरकारला मद्यविक्रीतून 25 हजार 323 कोटी रुपयाचा महसूल मिळाला होता. तर 2018-2019 या वर्षात 15 हजार 323 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, त्यात एका वर्षात 10 हजार कोटींची भर पडली होती. मुंबईपाठोपाठ पुणे शहर आणि जिल्ह्यातून मद्यविक्रीच्या माध्यमातून सर्वात जास्त महसूल मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -