घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट! २४ तासांत ४०७ नव्या रुग्णांची...

Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट! २४ तासांत ४०७ नव्या रुग्णांची नोंद, ४ जणांचा मृत्यू

Subscribe

महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. महाराष्ट्र आता कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. आज ५०० हून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ६५ हजार ७०५वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ४३ हजार ७०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६ हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात ९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ७७ लाख ११ हजार ३४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ७८ लाख ७५ हजार १०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६५ हजार ७०५ (१०.१०टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३२ हजार ८८६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यातील ओमिक्रॉनची परिस्थिती

आजपर्यंत राज्यात एकूण ४ हजार ६२९ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४ हजार ४५६ रुग्णांना त्यांची आर.टी.पी.सी.आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९ हजार ३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी ८ हजार ३३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १ हजार ०४९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.


हेही वाचा – India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या आज 10 हजारांच्या खाली; 8013 नवे रुग्ण, तर 119 रुग्णांचा मृत्यू


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -