Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Update: राज्यात २४ तासांत ४,०९२ नव्या रुग्णांची नोंद, ४० जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात २४ तासांत ४,०९२ नव्या रुग्णांची नोंद, ४० जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

राज्यात ४,०९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २०,६४,२७८ झाली आहे. राज्यात ३६,०६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५टक्के एवढा आहे.

राज्यात ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४, रायगड ९, नाशिक ३, पुणे २, सातारा ३, बीड ४, अमरावती ४, नागपूर ६ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ४० मृत्यूंपैकी १५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १८ मृत्यू रायगड-९, नागपूर ४, अमरावती २, बीड १, नाशिक १ आणि रत्नागिरी १ असे आहेत.

- Advertisement -

आज १,३५५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,७५,६०३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,२१,६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,६४,२७८ (१३.४७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७४,२४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – मुंबई लोकल सुरू होताच कोरोना रुग्णांमध्ये वाढ


- Advertisement -

 

- Advertisement -