घरमहाराष्ट्रराज्यात ४,१३२ नवे रुग्ण, १२७ जणांचा मृत्यू

राज्यात ४,१३२ नवे रुग्ण, १२७ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात १२७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,८०९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ४,१३२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,४०,४६१ झाली आहे. राज्यात ८४,०८२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १२७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,८०९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात १२७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १७, ठाणे ५, नवी मुंबई मनपा ३, मीरा भाईंदर मनपा ३, वसई विरार मनपा १९, अहमदनगर ८, पुणे ८, पिंपरी चिंचवड मनपा ६, सोलापूर ८, सातारा १३, नागपूर ८ आणि अन्य ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १२७ मृत्यूंपैकी ८० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू पालघर ९, पुणे ८, नागपूर १, नांदेड १, सातारा १, सिंधुदुर्ग १ आणि ठाणे १ असे आहेत.

- Advertisement -

आज ४,५४३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६,०९,६०७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९७,२२,९६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,४०,४६१ (१७.९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,१०,२६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,१७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -