Homeक्राइमNashik : वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू

Nashik : वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू

Subscribe

सातपूर परिसरातील महिंद्रा सर्कल येथे आयशर ट्रकच्या मागील टायरखाली आलेल्या ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सुनिता राजगुरू (वय 42, रा. राज्य कर्मचारी वसाहत, सातपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. (42-year-old woman dies in vehicle collision)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.२५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुनिता राजगुरू पतीसमवेत दुचाकी (एमएच१५-एएक्स ८९८१) वरून जात होत्या. महिंद्रा सर्कल सिग्नलजवळ आयसर ट्रकने दुचाकी कट मारला. या अपघातात दुचाकी आयशर ट्रकमागील चाकाखाली दाबली गेली. यामध्ये सुनीता राजगुरू यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती किरण हे गंभीर जखमी झाले. बांधकाम मिस्त्री काम करणारे किरण राजगुरू हे तीन वर्षांपूर्वीच राज्य कर्मचारी सोसायटीत भाडेतत्वावर राहत आहेत. सुनिता राजगुरु यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा परिवार आहे. सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी येत चालकास घेतले आहे.

सिग्नल असूनही वाहतूक कोंडी

वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महिंद्रा सर्कल येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याता आली आहे. मात्र, या ठिकाणी वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. परिणामी, या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी केली आहे.