घरताज्या घडामोडीनाशिक विभागातून 42 हजार विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी परिक्षा

नाशिक विभागातून 42 हजार विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी परिक्षा

Subscribe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आज घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या परिक्षेसाठी 42 हजार 708 विद्यार्थ्यांनी प्रविष्ठ झाले होते. या परिक्षेसाठी विभागातून 64 हजार 421 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. 21 हजार 703 विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर होते. नाशिक विभागातील 185 परीक्षा उपकेंद्रावर राज्य लोकसेवा आयोागाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी विभागातून 5 हजार 636 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती.

परिक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून एकूण 22 हजार 419 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 58 केंद्रावर 14 हजार 932 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 7 हजार 487 विद्यार्थी गैरहजर होते. अहमदनगर जिल्ह्यात 19 हजार 147 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 60 केंद्रावर 12 हजार 549 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 6 हजार 598 विद्यार्थी गैरहजर होते. धुळे जिल्ह्यात एकूण 7 हजार 749 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 23 केंद्रावर 5 हजार 242 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 2 हजार 497 विद्यार्थी गैरहजर होते. जळगाव जिल्ह्यातील ३५ केंद्रावर 7 हजार 540 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 3 हजार 923 विद्यार्थी गैरहजर होते. या परीक्षेसाठी 1 हजार 130 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर नंदुरबार जिल्ह्यातील 3 हजार 643 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 09 केंद्रावर 2 हजार 445 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 1 हजार 198 विद्यार्थी गैरहजर होते.

- Advertisement -

सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोविडच्या पार्श्वभुमीवर घेण्यात आलेल्या परिक्षेसाठी परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. तसेच वर्गखोलीत सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत परिक्षा घेण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -