Corona in Maharashtra: दिलासा! रिकव्हरी रेट ७१.३८ टक्के; तर १४,९२२ रुग्णांना डिस्चार्ज

आज १४,९२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६,५९,३२२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज

state corona update
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात कोरोना विषाणूचा कहर मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील नव्या रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ कायम आहे. मात्र अशापरिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३८% एवढे झाले आहे. आज १४,९२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६,५९,३२२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर आज राज्यात १६,४२९ नवीन रुग्णांचे निदान झाल्याचे समोर आले आहे. यासह राज्यात आज ४२३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंदकरण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.९३ % एवढा झाला आहे. कोरोना रूग्णांचे प्रमाण लक्षात येण्यासाठी आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४७,०५,९३२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,२३,६४१ (१९.६३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

तसेच, राज्यात आज एकूण २,३६,९३४ ऍक्टिव्ह रुग्ण असून राज्यात १५,१७,०६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,३४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये असल्याची माहिती महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १७८८ १५७४१० ३१ ७९००
ठाणे ३४५ २१८७१ ५५२
ठाणे मनपा ३०६ २८९८४ ९९८
नवी मुंबई मनपा ३४७ ३१४४३ ६८९
कल्याण डोंबवली मनपा ४५१ ३५४१० ६८२
उल्हासनगर मनपा ४० ८१८४ २९४
भिवंडी निजामपूर मनपा १० ४६५५ ३२०
मीरा भाईंदर मनपा २२३ १४३५३ ४५१
पालघर ६९ ९६२८ १६३
१० वसई विरार मनपा ९५ १८५५४ ४८१
११ रायगड ३६८ २०७९१ ५३६
१२ पनवेल मनपा २५९ १४८१७ ३० ३३३
१३ नाशिक २६७ ११३४१ २८३
१४ नाशिक मनपा २९८ ३२१८४ ५६४
१५ मालेगाव मनपा ३७ २८६७ ११९
१६ अहमदनगर २७० १४६७२ २०२
१७ अहमदनगर मनपा ७७ १०२६६ १५३
१८ धुळे ५०८१ १२४
१९ धुळे मनपा ४४८४ ११३
२० जळगाव २७३ २४३१५ ७४९
२१ जळगाव मनपा ८० ७५५२ १८६
२२ नंदूरबार २२ ३३०५ ८५
२३ पुणे ९२९ ३३२५५ ८३२
२४ पुणे मनपा २०३७ ११५२४० २७ २७८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११९९ ५४९७३ ८५६
२६ सोलापूर ३८४ १५९८६ ११ ४१२
२७ सोलापूर मनपा ६९ ७३२८ ४४३
२८ सातारा ४०१ १९०२२ ४३२
२९ कोल्हापूर ८५४ १९६४९ १६ ५७९
३० कोल्हापूर मनपा ४२६ ८५६९ २१७
३१ सांगली ३६२ ८८४१ २६४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७० १०३९२ ३०४
३३ सिंधुदुर्ग १०४ १८६२ २४
३४ रत्नागिरी २२० ५१९५ १६७
३५ औरंगाबाद ९७ ९०२० १४०
३६ औरंगाबाद मनपा १८४ १६४५२ ५६३
३७ जालना ९७ ५१६७ १५०
३८ हिंगोली ५६ १८२० ४१
३९ परभणी २३ १७३७ ४७
४० परभणी मनपा ४९ १७१८ ५४
४१ लातूर १४९ ६०७० १९८
४२ लातूर मनपा १०२ ४२०८ १२५
४३ उस्मानाबाद १६९ ७४४१ २१४
४४ बीड १९६ ५८२२ १५७
४५ नांदेड १९५ ५३९५ १४२
४६ नांदेड मनपा ८० ४०८० १२४
४७ अकोला ७१ २०७२ ६७
४८ अकोला मनपा ४७ २४४९ ९९
४९ अमरावती २४ १६४० ४५
५० अमरावती मनपा ९० ४४३८ १०१
५१ यवतमाळ ५१ ४१५७ ९३
५२ बुलढाणा ७० ४२१६ ८९
५३ वाशिम ५७ २१८३ ३६
५४ नागपूर ३८० ९२३७ १२३
५५ नागपूर मनपा ९४७ ३०२३४ १४९ ९२९
५६ वर्धा ५६ १५६८ २३
५७ भंडारा ८४ १८५५ २७
५८ गोंदिया १०९ २३४२ २५
५९ चंद्रपूर ५० २३८७ २३
६० चंद्रपूर मनपा ७१ १५८७ १८
६१ गडचिरोली १३ ९६७
इतर राज्ये /देश १९ ९०० ८४
एकूण १६४२९ ९२३६४१ ४२३ २७०२७