Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना ‘Endemic’ टप्प्यात, २४ तासांत ४२९ नव्या रूग्णांची नोंद

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच मुंबईकरांनाही आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ४२९ इतक्या नव्या रूग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांची संख्या ८२२ इतकी आहे. एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या १० लाख २९ हजार ८२८ इतकी आहे. त्याचप्रमाणे बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे.

मुंबईत एसिम्प्टोमॅटीक रूग्णांची संख्या ३५६ इतकी आहे. तर एकूण प्रगतीवर अहवाल ७३८,१३९ इतका आकडा आहे. रूग्णालयात आज ७१ जणांना दाखल करण्यात आले आहे. तर मुंबईतील एकूण सक्रिय रूग्णांची संख्या ३ हजार ६९८ इतकी आहे. तर दुप्पटीचा दर ९४९ दिवस इतका आहे.

आज दिवसभरात मुंबईत ४० हजार ६८२ चाचण्या रूग्णांवर करण्यात आल्या आहेत. तर एकूण चाचण्यांची आकडेवारी १५६,९२,३०६ इतकी आहे. मुंबईत मृतांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. २४ तासांत २ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा १६ हजार ६७८ इतका झाला आहे. कालच्या तुलनेत आज मृतांच्या संख्येत घट झाल्याचे पहायला मिळत आहे.

राज्यातील आकडेवारी काय?

राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार २४८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात १२१ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख २९ हजार ६३३ वर पोहोचली आहे.


हेही वाचा : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा, १०० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश