घरमहाराष्ट्रराज्यातील मृतांचा आकडा ४४ वर, तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती - वडेट्टीवार

राज्यातील मृतांचा आकडा ४४ वर, तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती – वडेट्टीवार

Subscribe

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा ४४ वर पोहोचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसंच, त्यांनी तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट देऊन माहितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी देखील परिस्थिती चिंताजनक आहे, राहील असं सागंत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

परिस्थिती चिंताजनक आहे

राज्यात शुक्रवारीही पावसामुळे परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट आहे असं म्हटलं. गेल्या चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहेत. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचं वचन दिलं आहे मदतकार्य आणि बचावकार्य सुरु आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -