घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईकरांना मोठा दिलासा! रूग्णांच्या संख्येत घट, २४ तासांत ४४१...

Mumbai Corona Update: मुंबईकरांना मोठा दिलासा! रूग्णांच्या संख्येत घट, २४ तासांत ४४१ नव्या रूग्णांची नोंद

Subscribe

संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोविड-१९ च्या नव्या विषाणूने देखील राज्यात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. मागील २४ तासांत ४४१ इतक्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहेत. तर ९ रूग्णांचा मृ्त्यू झाला आहे. काल(मंगळवार) मुंबईत एका दिवसात ४४७ इतके रूग्ण आढळून आले होते. मात्र, आजच्या तुलनेत रूग्णांच्या संख्येत घट झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे.

मुंबईत २४ तासांत ४४१ नवे रूग्ण आढळून आल्यामुळे एकूण रूग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ६१७ इतकी झाली आहे. तसेच दिवसभरात आज ६५ रूग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर २४ तासांत १ हजार ११५ इतकं रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या १० लाख २९ हजार ६ इतकी आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्र्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसिम्प्टोमॅटीक बाधितांची संख्या ३७६ इतकी असून ७ लाख ३७ हजार ७८३ इतकी एकूण आकडेवारी अहवालातून समोर आली आहे. मुंबईत एकूण सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ९६ इतकी आहे. तर मृतांची एकूण संख्या १६ हजार ६७६ झाली आहे.

- Advertisement -

रूग्ण बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका असून दुप्पटीची दर ८४० दिवस इतका आहे. २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान कोविड वाढीचा दर ०.०८% इतका आहे. २४ तासांत ३७ हजार ८०० रूग्णांवर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाचण्यांची एकूण संख्या १५६,५१,६२४ इतकी झाली आहे.


हेही वाचा : अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता?, १५ फेब्रुवारीच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -