घरताज्या घडामोडीराज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नव्या रुग्णवाहिका; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नव्या रुग्णवाहिका; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ४४२ रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती.

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार असून शुक्रवारी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी वित्त व नियोजन मंत्रीसुद्धा असलेल्या अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ४४२ रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपलब्ध करण्यात आलेल्या निधीतून नव्या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे.

गरजेनुसार रुग्णवाहिकांचे वितरण

या ४४२ नव्या रुग्णवाहिका राज्याच्या आरोग्य यंत्रणेत दाखल झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी १२, सातारा १३, सोलापूर ९, कोल्हापूर १७ आणि सांगली ९ रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यांना त्यांच्या मागणी आणि गरजेनुसार रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण 

तसेच टाटा कंपनीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ३०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ४ ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, टाटा कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -