Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक, मागील २४ तासांत ४४७ नव्या रूग्णांची नोंद

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असताना आज पुन्हा एकदा रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्य २४ तासांत मुंबईत ४४७ इतक्या नव्या रूग्णांची वाढ झाली असून मृत्यृच्या संख्येत घट मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. २४ तासांत एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. काल(सोमवार) मुंबईत ३५६ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. तर ५ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु आज मृत्यूच्या दरात घट झाली आहे.

मुंबईत २४ तासांत ७९८ इतके रूग्ण बरे झाले आहेत. तर एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या १० लाख २७ हजार ८९१ इतकी आहे. तर बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे. तसेच मुंबईतील एकूण सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ७८३ इतकी झाली आहे. दिवसागणिक दुप्पटीचा दर ८०८ इतका असून कोविड-१९ वाढीचा दर १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत ०.०९ टक्के इतका होता.

मुंबईत एसिम्पटोमॅटीक रूग्णांची संख्या ३८० इतकी असून ७ लाख ३७ हजार ४०७ हा प्रगतीपर अहवाल सादर करण्यात आला आहे. रूग्णालयात ६४ रूग्णांना दाखल करण्यात आले आहेत. तर बेडवरील रूग्णांची संख्या १९ असून ही एकूण संख्या ५९९ इतकी झाली आहे. मुंबईत एकूण मृतांची संख्या १६ हजार ६६७ इतकी आहे. तसेच आज मुंबईत ३४ हजार ५४३ इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून १५ कोटी ६ लाख १३ हजार ८२४ इतक्या एकूण चाचण्या करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : IRCTC Q3 Result : IRCTC मालामाल ! डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दुप्पट नफा