ठाण्यात एकाच दिवशी ४५१ किलो प्लॅस्टिक जप्त

ठाणे। : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रात नियमित प्लॅस्टिक बंदी कारवाई सुरू असून सोमवारी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत वागळे इस्टेट, उथळसर, कळवा व दिवा प्रभागसमिती कार्यक्षेत्रात कारवाई करण्यात आली. या तिन्ही विभागाअतंर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ४५१ किलो प्लॅस्टिक जप्त केला असून यापोटी ११ हजार-५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

वागळे प्रभाग समिती अंतर्गत प्लास्टिक बंदी अभियान राबविण्यात आले. या विभागात एकूण २३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून एकूण ३ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून त्यांचकडून ५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत गोकुळ दास वाडी खोपट येथील एका प्लास्टिक गोडावून मध्ये ४५० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून ५००० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात एकूण ८ आस्थापनांना भेटी देऊन ०१ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून त्यापोटी एकूण दंड १ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आला. सदरची कारवाई आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक जयंत पटनाईक, रायमन दांडेकर, उपमुख्य स्वच्छता यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.