घरताज्या घडामोडीधक्कादायक! पुण्यात १२ तासांत ४८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

धक्कादायक! पुण्यात १२ तासांत ४८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Subscribe

पुणे जिल्ह्यात १२ तासांत ४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गेल्या १२ तासांत नव्याने ४८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ९ हजार ७८७ एवढी झाली आहे. तर जिल्ह्यात ४२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – औरंगाबादमध्ये नव्या ७२ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार पार

- Advertisement -

राज्यात २४ तासांत १०९ जणांचा बळी

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज कोरोनामुळे १०९ जणांचे बळी गेले आहेत. तसेच एका दिवसात २ हजार ५५३ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ३ हजार १६९ वर पोहोचला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ झाला आहे. तसेच एका दिवसात १ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत राज्यात एकूण ४० हजार ९७५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशभरात २४ तासांत ९ हजार ९८७ नवे रुग्ण

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ६६ हजार ५९८ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख २९ हजार २१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार ४६६ जणांचा मृत्यू झालेला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -